नरेन तांबे - लेख सूची

निष्ठा : दोन पैलू

अॅरिस्टॉटल हा प्रकांड ग्रीक पंडित होता हे त्याच्या ग्रंथ-निर्मितीवरून चटकन कोणाच्याही लक्षात येईल. मानसशास्त्र, तर्कशास्त्र, शरीरविज्ञान, नाट्य-शोकांतिका व इतर विषयांवर त्याने लिहिलेली विद्वत्ताप्रचुर पुस्तके हे त्याच्या पांडित्याचे पुरावे म्हणून देता येतील. प्लेटोचा तो अत्यंत आवडता शिष्य. प्लेटोने “अकॅडमी’ची स्थापना करून जनतेच्या ज्ञानलालसेला जशी चालना दिली तसाच प्रयत्न अॅरिस्टॉटलने “लायसेयम’ही ज्ञानवर्धिनी संस्था निर्माण करून आपली गुरुपरंपरा …

सॉक्रेटीस: सत्यप्रेमी की स्वार्थप्रेमी?

सॉक्रेटीसचे स्थान पौर्वात्य अन् पाश्चात्त्य संस्कृतीत ध्रुवाच्या तान्यासारखे अढळ होऊन बसले आहे. माझे अमेरिकन शिक्षक त्याच्या कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा करून त्यानेच जनकल्याणासाठी तत्त्वज्ञान स्वर्गातून पृथ्वीवर आणले असे मोठ्या अभिमानाने ठासून सांगत. त्यावेळी मला नेहमी आम्हाला शिकविणा-यांना अशा शिक्षकांचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास किती एकांगी असतो ह्याची चांगली कल्पना येई. मी एकदा चर्चेच्या वेळी म्हणालो, “सर, प्लेटोच्या …

अमेरिकेतील शिक्षकसंघ: सामर्थ्य आणि संघर्ष

आज अमेरिकेत शिक्षकांच्या हक्कांसाठी झगडणारे व शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलेले नॅशनल एज्युकेशनल असोसिएशन (एन्.ई.ए.) व अमेरिकन फेडरेशन ऑफ टीचर्स (ए.एफ.टी.) असे दोन संघ आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ह्या दोन संघटना कुत्र्या-मांजरांसारख्या उघडपणे मांडत आहेत. दरवर्षी ह्या संघटनांचे प्रतिनिधी आपल्या वार्षिक संमेलनात एक संघटनेच्या मागणीचा प्रस्तावही मांडतात. पण दोन्ही संघटनांचे प्रतिनिधी तो बहुमतांनी फेटाळून लावतात. …

अमेरिकन शिक्षण : दशा आणि दिशा

सार्वजनिक शाळांचा जनक म्हणून गणला जाणारा होरेस मॅन हा १८३० च्या एका भाषणात म्हणाला होता, ‘शिक्षण हाच सामाजिक समतेचा पाया आहे. १६३५ ते १८०० पर्यंत येथील बहुसंख्य विश्वविद्यालये व प्राथमिक माध्यमिक शाळा खाजगी मालकीच्याहोत्या. शिक्षण हे पैसेवाल्यांच्या हातातील खेळणे होऊन बसले होते. मध्यमवर्ग व तळागाळाची जनता ही शिक्षणापासून जवळजवळ वंचित झाली होती. पण अशी ‘स्फोटक …